Ram Shinde
Ram Shinde

Ahmednagar news : आमदारसाहेबांचा एक फोन अन् श्रद्धाच्या आयुष्याला मिळाली कलाटणी

Published on

- आशिष निंबोरे

Ahmednagar news मिरजगाव : मोबाईलवरून केलेला एक फोन, ही वरवर पाहता साधी वाटणारी गोष्ट एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते याचा प्रत्यय नुकताच कर्जत तालुक्यात आला.

Ram Shinde
Food poisoning : यात्रेच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा! एकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती स्थिर

तालुक्यातील नागापूर येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली श्रद्धा सुभाष अनंत्रे भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी घेऊन प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करणारी ही मुलगी.मिरजगाव येथील टायगर करियर अकॅडमी मध्ये जीवाचे रान करत तिने भरतीसाठी मेहनत घेतली. स्वतःची जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन या जोरावर तिने अग्नीवर भरती प्रक्रियेत यश मिळविले.

भारतीय नेव्हीमध्ये सेवा देण्याची संधी मिळणारी तालुक्यातील पहिली मुलगी होण्याचा मान तिला मिळणार, हा आनंद पालकांसह समस्त नागापूरकरांना होता. भरती प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. (Latest Marathi News)

यासाठी श्रद्धा ओडिसा येथे पोहचली देखील. त्याठिकाणी गेल्यानंतर या आनंदावर विरजण पडेल की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली. अपुऱ्या माहितीमुळे एक महत्वाचा कागद नसल्यामुळे श्रद्धाला पदभार स्वीकारता येणार नाही, असे तेथील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.

Ram Shinde
Congress : महाराष्ट्रातील २१ लोकसभा मतदारसंघांत परिस्थिती उत्तम! काँग्रेसच्या जिल्हावार बैठकीतील निष्कर्ष

अशा परिस्थितीमध्ये मुलीचे कुटुंब हातबल झाले होते. श्रद्धाच्या वडिलांनी नागापूरचे ग्रामपंचायत सदस्य राहुल सुरेश निंबोरे यांच्याशी संपर्क साधला. आमदार राम शिंदे यांना सांगून आवश्यक कागद मिळवून द्या, अशी विनंती केली. राहुल निंबोरे यांनी आमदार राम शिंदे यांना परिस्थितीची माहिती दिली.

आमदार राम शिंदे यांनी देखील काही काळजी करू नका, मी तुम्हाला नक्कीच मदत करेल असे आश्वासन दिले. त्यानंतर शिंदे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला आणि संबंधित कागदपत्रांची तात्काळ पुर्तता करण्याची सूचना केली. (Marathi Tajya Batmya)

यानंतर दिलेली मुदत संपण्याच्या दहा मिनिटे आधी श्रद्धाला आवश्यक कागद मिळाला आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. भारतीय नेव्हीमध्ये काम करण्याचे श्रद्धाचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याने कुटुंबीयांनी राम शिंदे यांचे आभार मानले.

या प्रक्रियेमध्ये टायगर करियर अकॅडमीचे संचालक हर्षद चौकडे, किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, आमदार शिंदे यांचे कर्जतचे स्वीय सहाय्यक संभाजी गोसावी, पीएसआय अमोल कवळे यांचे विशेष सहकार्य मिळाले अशी माहिती राहुल निंबोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com