esakal | आधी मुलीला संपवलं, नंतर आई-बापांनी केली आत्महत्या; अहमदनगरमधील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : आधी मुलीला संपवलं, नंतर आई-बापांनी केली आत्महत्या

अहमदनगर : आधी मुलीला संपवलं, नंतर आई-बापांनी केली आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- अशोक तांबे

अहमदनगर : कर्जाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केडगावमध्ये घडली आहे. पती, पत्नी आणि मुलीने कर्जाला कंटाळून आपलं जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक पोहचलं आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुर्घटनास्थळावर सुसाईड नोटही आढळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव येथील एकाच कुटुंबातील तीन जण मृतावस्थेत आढळून आले आहेत. आई वडीलांनी दहा वर्षाच्या मुलीला गळफास देवून नंतर स्वत:ही गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यात आईवडीलांसह लहान मुलीचा समावेश आहे. केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर ठुबे मळा येथील फाटक कुटुंबात हा प्रकार घडला. संदिप दिनकर फाटक, (वय 40), किरण संदिप फाटक (वय 32), मैथिली संदिप फाटक (वय 10 ) अशी मयतांची नावे आहेत. फाटक हे व्यावसायिक होते. परंतु, व्यवसायात अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. सकाळी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

संदीप फाटक हे सारोळा कासार येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून केडगाव येथे राहत होते. एका कंपनीची एजन्सी त्यांच्याकडे होती. किराणा दुकानात साहित्य पोहोचवण्याचे काम करत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. व्यावसायात हवं तसं यश मिळत नव्हतं. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे.

loading image
go to top