अहमदनगर : पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला गेले तडे

वारकऱ्यांची वाट सुकर होण्यासाठी दर्जेदार कामाची मागणी
Ahmednagar Paithan Pandharpur National Highway damage
Ahmednagar Paithan Pandharpur National Highway damagesakal

बोधेगाव : पैठण, पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरु असलेल्या सिमेंट रस्ते कामाला शेवगाव तालुक्यातील बोधेगाव-हातगाव परिसरात तडे गेले आहेत. या महामार्गाचे काम असेच निकृष्ट होत राहिल्यास भविष्यात या रस्त्यावर मोठे खड्डे पडुन दळणवळणाबरोबरच वारकऱ्यांची वाटही बिकट होणार आहे.

पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पायी पालखी कित्येक वर्षापासून हजारो वैष्णवांच्या जनसमुदायात हरिनामाचा गजर करत पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाते. परंतु, रस्ता आणि पायी वाटेमुळे वारकऱ्यांना पावसाळ्यात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या सर्वांचा विचार करत केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी पैठण, पंढरपुर पालखी मार्गाला मंजुरी दिली. कामाचा सर्वे चालू असताना पालखी मार्ग आजुबाजुच्या गावातून जात असल्याने यामध्ये रस्ते कामाला अडचणी निर्माण होत होत्या. यावर गडकरींनी तोडगा काढत पालखी मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात केले. परंतु, बोधेगाव, हातगाव दरम्यान सिमेंट रस्त्याच्या मध्यापासून रोडच्या कडेपर्यंत तडे गेल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत सर्वसामान्य नागरीकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, रस्त्यावरील तड्यांचे प्रमाण आणि कामाचा दर्जा असाच राहिल्यास रस्त्यांवर मोठे खड्डे पडण्याची भिती व्यक्त होत आहे.

निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यामुळे भविष्यात पायी जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबर गावच्या विकासातील महत्वाचा घटक म्हणून मानल्या जाणाऱ्या दळणवळणातही अडचणी निर्माण होतील. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी ज्या उद्देशाने महामार्गाची निर्मिती केली ते साध्य करण्यासाठी महामार्गाचे काम उत्कृष्ट दर्जाचे कसे होईल याकडे लक्ष देण्याची अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त होत आहे.

दोन वर्षापासून जमिन अधिग्रहनाच्या फेऱ्यात अडकलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम रस्त्याची रुंदी कमी करून सुरु करण्यात आले आहे. परंतु, पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी जमिनीत घुसत असल्याने मोठ्या नुकसानिला सामोरे जावे लागते. त्यामुळे महामार्ग व्यवस्थापकाने पावसाळ्यापूर्वी तात्काळ रस्त्यालगत साईड गटारासाठी नियोजन करावे.

- दत्तात्रेय शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी बोधेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com