Ahmednagar Politics : फूट कोणाच्या पथ्यावर, कोणाच्या माथ्यावर!

Ahmednagar Politcs
Ahmednagar Politcs

NCP Political Crisis : अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात बारा आमदार आहेत, त्यापैकी सहा आमदार राष्ट्रवादीचे, कॉंग्रेसचे दोन आणि भाजपचे तीन आणि एक अपक्ष असे बलाबल आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे येथे भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील, असा विश्वास भाजपच्या मंडळींना वाटत होता.

राष्ट्रवादीचे बडे नेते गळाला लागतील असेही बोलले जात होते, तसे मात्र झाले नाही. उलट या पक्षाचे वजनदार नेते अजित पवार यांनीच बहुसंख्य आमदारांबरोबर घेऊन शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

Ahmednagar Politcs
Mumbai : अवघ्या 4 महिन्यातच, 645 कोटी खर्चून बांधलेल्या पुलाची दुरावस्था; पहिल्याच पावसात खड्डेच-खड्डे

या सहा आमदारांपैकी नगरचे संग्राम जगताप, पारनेरचे नीलेश लंके आणि अकोलेचे डॉ. किरण लहामटे हे अजित पवारांसोबत दिसले. उर्वरित तीन आमदारांपैकी कोपरगावचे आशुतोष काळे हे परदेशात आहेत. कर्जत-जामखेडचे रोहित पवार आजोबांबरोबरच राहिले.

राहुरीचे प्राजक्त तनपुरे हे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यांच्या मामांनी तर शरद पवार यांच्याबरोबरच राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिकडे मामा तिकडे भाचा असणार. म्हणजे राष्ट्रवादीचे सहापैकी तीनजण तर सत्तेला चिकटले आहेत.

नगरचे आमदार संग्राम जगताप हे भाजपच्या जवळ गेल्याची चर्चा या ना त्या कारणांने नेहमीच होत राहिली. मात्र, त्यांनी कधीही उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. आपण राष्ट्रवादी कदापि सोडणार नाही असेही ते बोलून दाखवित. ते आजही राष्ट्रवादीचे असले तरी शिवसेना-भाजप सरकारबरोबर गेले आहेत. सर्वांत आश्‍चर्य वाटले ते नीलेश लंके यांचे.

जे लंके शरद पवारसाहेब माझं दैवत आहेत, अशी सातत्याने जपमाळ जपत होते, त्यांनी साहेबांची साथ सोडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. डॉ. लहामटे हे मात्र सुरवातीपासून अजित पवारांचे खंबीर पाठीराखे. वेळोवेळी त्यांना अजित पवारांनी मदत केली. अकोल्यात पिचडांच्या विरोधात ते टोकाची भूमिका घेत आले आहेत.

Ahmednagar Politcs
Jayant Patil : विरोधी पक्षनेतेपदावरुन शरद पवार-जयंत पाटलांमध्ये मतभिन्नता? पवार म्हणाले काँग्रेसच...

विखे-लंके संघर्ष संपेल का?

पारनेरचे आमदार नीलेश लंके आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे. लंके हे लोकसभा लढणार असल्याचा चर्चांना गेल्या काही महिन्यांपासून उधाण आले होते. आजच्या घडामोडीकडे पाहिले तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी आणखी सोपा होईल असे दिसते. आगामी निवडणुकीत चित्र बदलले दिसेल. शिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप ज्याला तिकिट देईल तो सहज जिंकेल यात शंका घेण्याचे कारणही नाही.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा बाल्लेकिल्ला आहे. राज्यात कितीही मोठा राजकीय भूकंप झाला तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. तसेच श्रीरामपूरही कॉंग्रेसकडे आहे. लहू कानडेंचेही मतदारसंघावर वर्चस्व आहे. नेवाशातही अपक्ष शंकरराव गडाख यांनी किल्ला शाबूत ठेवला आहे. पाथर्डीत भाजपच्या मोनिका राजळे यांचे वर्चस्व आहे. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते आमदार असले तरी येथे राष्ट्रवादीचे राहुल जगताप दंड थोपटून आहेत. आगामी निवडणुकीत भाजप तीनवरच राहतो की वाढतो, राष्ट्रवादीच्या सहा पैकी किती जागा टिकतील हे पाहावे लागेल.

शेवटी एका गोष्टीकडे लक्ष वेधावे लागेल की जिल्ह्याने सहा आमदार राष्ट्रवादीला दिले आहेत. गेल्या सरकारमध्ये प्राजक्त तनपुरे मंत्री होते. आज अजितदादांबरोबर गेलेल्यांपैकी एखादा मंत्री होईल असे वाटले होते, तसे मात्र झाले नाही. एकंदरीत राष्ट्रवादीत फडलेली फूट आगामी निवडणुकांत कोणाच्या पथ्यावर आणि कोणाच्या माथ्यावर पडेल, हे निकालानंतरच कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com