Jayant Patil : विरोधी पक्षनेतेपदावरुन शरद पवार-जयंत पाटलांमध्ये मतभिन्नता? पवार म्हणाले काँग्रेसच...

NCP Political Crisis: शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. तर आज जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.
Jayant Patil : विरोधी पक्षनेतेपदावरुन शरद पवार-जयंत पाटलांमध्ये मतभिन्नता? पवार म्हणाले काँग्रेसच...
Updated on

Mumbai News : राज्याच्या राजकारणात काल भूकंप झाला अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. सुरुवातीला हे बंड शरद पवारांच्या संमतीने तर झालं नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असतांना पवारांनी भूमिका जाहीर करुन बंड झाल्याचं जाहीर केलं.

शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. तर आज जयंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

दरम्यान, शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केलीय. यावेळी पत्रकारांशी बोलतांना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाबद्दल थेट आणि स्पष्टपणे विधान केलं.

Jayant Patil : विरोधी पक्षनेतेपदावरुन शरद पवार-जयंत पाटलांमध्ये मतभिन्नता? पवार म्हणाले काँग्रेसच...
Amol Kolhe : 'बाप नाही विसरायचा...',काल अजित पवारांना पाठिंबा अन् आज खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत

शरद पवार म्हणाले की, ज्यांचं संख्याबळ जास्त असेल त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. काँग्रेसने तशी मागणी केली असेल तर ती रास्त आहे. विधानसभेत संख्यावळावर नेतेपदाची निवड होते. त्यामुळे आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, हे स्पष्ट आहे.

दुसरीकडे काल जयंत पाटील यांनी मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणाही केली. पत्रकार परिषदेमध्ये तसं जाहीर केलं. प्रतोद आणि विरोधी पक्षनेता जितेंद्र आव्हाड असं जयंत पाटीलही म्हणाले आणि खुद्द जितेंद्र आव्हाडही म्हणालेले. त्यामुळे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये विरोधी पक्षनेते पदावरुन मतभिन्नता आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Jayant Patil : विरोधी पक्षनेतेपदावरुन शरद पवार-जयंत पाटलांमध्ये मतभिन्नता? पवार म्हणाले काँग्रेसच...
NCP : राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई; जयंत पाटलांचं मोठं पाऊल

मुळात सभागृहात ज्यांच्याकडे संख्याबळ असतं त्यांचाच नेता निवडला जातो. हा नियम आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी काल जितेंद्र आव्हाडांच्या नावाची घोषणा करुन गोंधळ निर्माण केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com