भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर नगरचा वचक, राम शिंदे उपाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव एकेकाळी चर्चेत होते. शिंदे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

नगर ः भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. यात जिल्ह्यातील माजी मंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे. राम शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्ष आणि स्नेहलता कोल्हे यांना मंत्री करण्यात आले आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव एकेकाळी चर्चेत होते. शिंदे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

जिल्ह्यात भाजपमध्ये शिंदे गटाचे मोठे वर्चस्व आहे. चंद्रकांत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने शिंदे यांच्याकडे उपाध्यक्षपद सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - जामखेडची निवड प्रक्रिया पूर्ण, निकाल सीलबंद

प्रदेश कार्यसमिती सदस्यपदी भानुदास बेरड, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्यपदी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, चंद्रशेखर कदम, प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना मात्र स्थान मिळाले नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा आहे. 

नगर जिल्ह्याने मागील निवडणुकीत चांगली साथ दिली होती. नंतर राज्यात फडणवीस सरकार आल्याने पक्षाची जिल्ह्यात ताकद वाढली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मेगा भरती झाली. त्यात दिग्गज नेत्यांनी भाजपची सोबत केली. माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासारख्या मंडळींनी दोन्ही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता जिल्ह्यात कार्यकारिणी निवडण्यात आली. निवडीकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar posts on BJP party