esakal | जामखेडच्या सभापतीपदासाठी निवडणूक झाली...निकाल सीलबंद
sakal

बोलून बातमी शोधा

Selection process for Jamkhed chairman completed ... Results sealed

आमदार रोहित पवारांनी ऐकामागून एक सत्तास्थाने माजी मंत्री राम शिंदेंच्या हातून काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. पंचायत समितीत नेमके काय घडते? याकडे सर्वांचे लक्ष होते. मुरूमकर यांच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जामखेडच्या सभापतीपदासाठी निवडणूक झाली...निकाल सीलबंद

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड ः जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, सभापतीपदाचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाच्या पुढीलं आदेशानंतरच जाहीर होणार आहे. या संदर्भात मंगळवार (ता.07) रोजी औरंगाबाद खंडपीठाने याचिकाकर्त्यांना तारीख दिली अाहे. त्याकडे जामखेडसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध सदस्य डॉ.भगवान मुरुमकर न्यायालयात गेले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पूर्वीचे आरक्षण होते. त्याच आरक्षणाच्या आधारे अर्ज दाखल केला. मात्र, त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी अपात्र ठरविला. नव्याने पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आजी-माजी उपसभापतीमध्ये सरळ लढत झाली.

हेही वाचा - इंदोरीकर महाराज हाजिर हो

भाजपकडून मनिषा सुरवसे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजश्री मोरे या दोघींत ही लढत रंगली. या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली.
मात्र, सभापतीपदाच्या नावाची घोषणा औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार जाहीर केली नाही.

या संदर्भात मंगळवारी ( ता.07) न्यायालय कोणत्या आदेशावर शिक्कामोर्तब करते. यावरच जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाची भिस्त अवलंबून आहे.

जामखेडवर कोणाचा झेंडा 

आमदार रोहित पवारांनी ऐकामागून एक सत्तास्थाने माजी मंत्री राम शिंदेंच्या हातून काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. पंचायत समितीत नेमके काय घडते? याकडे सर्वांचे लक्ष होते. मुरूमकर यांच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image