
अहमदनगर : स्पर्धेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक
श्रीरामपूर : सध्याचे युग माहिती, तंत्रज्ञान, संशोधन व स्पर्धेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवरील बदलते तंत्रज्ञान व नवनवीन संकल्पना समजून घ्याव्यात. स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात संगणक विभाग व अंतर्गत गुणवत्ता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात वापर, या विषयावर आयोजित एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. निंबाळकर बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते अर्चना निगडे, अश्विनी ढोकणे, योगीराज चंद्रात्रे, विवेक मोरे उपस्थित होते.
अर्चना निगडे म्हणाल्या, की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रात्यक्षिक ज्ञान हे गुण आत्मसात करावेत. अश्विनी ढोकणे यांनी मुलाखतीसाठी जाताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान व अनुभव आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, वाणिज्य व संशोधन विभागप्रमुख डॉ. राजेंद्र कळमकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिक सय्यद, अशोक नाबगे, डॉ. बापूसाहेब घोडके उपस्थित होते. प्रास्ताविक रोहिदास लांडे यांनी केले. सूत्रसंचालन भाग्यश्री भावसार यांनी केले. आभार पुष्कर जोशी यांनी मानले.
Web Title: Ahmednagar Quality Education Essential Competition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..