
अहमदनगर : भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव
अकोले : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा बसला. मागील चोवीस तासांत घाटघर येथे ११ इंच, रतनवाडीत साडेदहा इंच, भंडारदरा येथे दहा इंच पावसाची नोंद झाली. आढळा, शिळवंडी-घोटी जलाशय रात्री उशिरा ओव्हर-फ्लो होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पावसाने रस्ते व भातपिके पाण्याखाली गेली आहेत. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. कृष्णावंती नदीला पूर आला आहे. भंडारदरा जलाशयात वेगाने पाण्याची आवक होत असून, सायंकाळी सहा वाजता जलाशयात ६९४७ (६२.९३ टक्के) दशलक्ष घनफूट जलसाठा झाला. आज ४३३.६२ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली, तर वीजनिर्मितीसाठी ८४५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. निळवंडे जलाशयात ५१८८ (६२.२९ टक्के) दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. १२ तासांत २८४ दशलक्ष घनफूट पाण्याची अावक झाली आहे.
Web Title: Ahmednagar Rainstorm In Bhandardara Flood
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..