अहमदनगर : महागाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

inflation

अहमदनगर : महागाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

अहमदनगर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणातून दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे हे मुश्किल होत आहे. आधीच महागाईमध्ये होरपळत असलेल्या जनतेला केंद्र सरकारने पुन्हा एकदा धक्का दिला. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत आज ५० रुपयांनी वाढ केली आहे. या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ केल्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ चूल पेटवून स्वयंपाक करण्यात आला. यावेळी लता गायकवाड, रेणुका पुंड, शीतल गाडे, नंदा पांडुळे, उषा मकासरे, निर्मला जाधव, गीता कामत, शालिनी राठोड, वैशाली गुंड, सुनंदा कांबळे, सुनीता पाचरणे आदी उपस्थित होते.

सिलिंडरच्या दरात आज 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एक सिलिंडरसाठी नागरिकांना १०५३ रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे कुटुंबाचे बजेट कोलमढले आहे. यापूर्वी मे महिन्यातही गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आधीच नागरिक त्रस्त आहे. याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक बेझार झालेला मात्र केंद्र सरकार महागाई कमी करणे ऐवजी नव्हे तर जाहीर करून सर्वसामान्यांना एका मागून एक महागाईचे धक्के देण्याचे काम करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा चूल पेटवून निषेध करण्यात आला.

Web Title: Ahmednagar Rashtrawadi Congress Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top