esakal | नगरकरांना होणार सौरऊर्जेवर पाणीपुरवठा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar residents will get water supply on solar energy

हे काम राज्य सरकारच्या महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) व प्रिमियम या कंपन्यांना देण्यात आले आहे. 

नगरकरांना होणार सौरऊर्जेवर पाणीपुरवठा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः महापालिकेच्या जलवितरणासाठी पंपिंग स्टेशन व पाण्याच्या टाक्‍यांना अमृत योजनेनुसार सौरऊर्जा दिली जाणार आहे. यासाठी महापालिका आठ ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभे करणार आहे. या प्रकल्पातून रोज 1650 किलोवॉट वीज मिळणार आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक नुकतीच झाली. तीत जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त डॉ. राजेंद्र भोसले, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, महापालिकेचे उपायुक्‍त संतोष लांडगे, महापालिका शिक्षण मंडळाचे सुनील पवार, वृक्ष अधिकारी उद्धव म्हसे, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, मंदार साबळे उपस्थित होते.

महापालिकेच्या या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे 28 वृक्ष तोडावे लागणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, कमीत कमी वृक्षतोड होईल असे काम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा - कट्टर विरोधक विखे-थोरात गट झाले एक

हे प्रकल्प शहरातील पाच, तर ग्रामीण भागातील तीन ठिकाणी असणार आहेत. यात केडगाव एमआयडीसी (केडगाव), बुरुडगाव रस्त्यावरील फुलसौंदर मळा, आगरकर मळा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील पाण्याची टाकी, नागापूर, विळद घाट पंपिंग स्टेशन व मुळा धरण येथे हे सौरऊर्जा प्रकल्प उभे केले जातील.

हे काम राज्य सरकारच्या महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) व प्रिमियम या कंपन्यांना देण्यात आले आहे. 

महापालिकेचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महापालिकेने पर्यावरणपूरक सौरऊर्जेचा प्रकल्प प्रथमच राबविला आहे. महापालिकेने असाच उपक्रम त्यांच्या सर्व कार्यालयांची छते व नालेगाव अमरधाम येथे राबवावा. 
- सुरेश खामकर, अध्यक्ष, हरियाली संस्था