अहमदनगर : शाळांची घंटा आज वाजणार! | Ahmednagar School News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar School News

अहमदनगर : शाळांची घंटा आज वाजणार!

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून शाळांची साफसफाई जोरात झाली. आता उद्या (ता. १५) विद्यार्थी येणार असल्याने सर्व शाळा सज्ज झाल्या आहेत. विद्यार्थीही गेल्या दोन दिवसांपासून कपडे, वह्या, पुस्तकांची खरेदी करून ऐटीत शाळेत जाण्यासाठी तयार झाले आहेत. जिल्ह्यातील पाच हजार ३६५ शाळा उद्यापासून सुरू होत आहेत. सुमारे नऊ लाख विद्यार्थी उद्या शाळेत हजर होतील. (Ahmednagar School News)

नियमित होत नव्हत्या. प्राथमिक शाळा तर अनेक दिवस बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण दिले जात असले, तरी त्यात अनेक अडचणी होत्या. अशाही परिस्थितीत जिल्ह्यात ऑनलाइनचे काम चांगले झाले. त्याचे प्रत्यंतर बारावीच्या निकालात दिसून आले. पुणे विभागात अहमदनगर प्रथम आले.

आता नव्याने पूर्ण वेळ शाळा सुरू होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शाळेत सफाई केली जात होती. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. तशा सूचना बहुतेक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना ग्रुपवर देण्यात आल्या. नखे काढलेली असावीत, मुलांनी केस व्यवस्थित कापलेले असावेत, स्वच्छ कपडे हवेत, शूज चकाचक हवेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. एकूणच, शाळा भरविण्याची पूर्ण तयारी शाळांनी केली आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी येण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. सफाई व्यवस्थित करण्यात आली आहे. शिक्षकांनी गेल्या दोन दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे. पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. शालाबाह्य विद्यार्थी असल्यास कळवावे.

- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

आकडे बोलतात

५३६५

एकूण शाळा

३२५२०

एकूण शिक्षक

८९१५०५

एकूण विद्यार्थी

Web Title: Ahmednagar School Bells Ring Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top