Science Park in ZP School: झेडपी शाळांमध्ये सायन्स पार्क, पन्नास लाख रुपयांची तरतूद; गाव घेणार पुढाकार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५० लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
Ahmednagar
Ahmednagar Esakal

Ahmednagar Science Park in ZP School: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५० लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मात्र, त्यासाठी गावाने जागा देऊन स्वतः आर्थिक बाबींसाठी पुढाकार घ्यावा लागेल. त्यानंतर ही योजना त्या गावातील शाळेत राबविली जाईल.

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर प्रशासक आशिष येरेकर यांनी नावीन्यपूर्ण योजनांबाबत माहिती दिली. सायन्स पार्क ही योजना चंद्रपूरच्या धर्तीवर राबविली जाणार आहे. अवकाशासंदर्भात उपकरणे मोकळ्या जागेत उभारून विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती वाढवली जाणार आहे. या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाचा निधी शिक्षण विभागाकडे वळवला आहे.

त्यातूनच या अभिनव योजनांना गती दिली जाणार आहे. आरोग्यावर या अर्थसंकल्पात भर दिल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांपासून इस्त्रो सहलीला कात्री लावली होती. तीही मिशन स्पार्क या नावाने पुन्हा आणली आहे. त्यात इस्त्रोसोबतच आयआयएस व डीआरडीओसारख्या संस्थांना विद्यार्थी भेटी देऊ शकतात. शिक्षण विभागासाठी मिशन आरंभ ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

तिसरी व चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पुस्तिका छापली जाणार आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वाटप केले जाईल. त्यांच्यासाठी ऑनलाइन तासिका घेतल्या जातील. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क भरली जाते. त्यासाठी भरीव तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी क्यूआरमुळे सुलभ होणार आहे. त्यातून कर्मचाऱ्यांना ट्रॅकही करता येईल. नांदेड, ठाण्यात ती यशस्वीपणे राबविली जाते. यासाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे. (Latest Marathi news )

Ahmednagar
Vasant More: 'नकारात्मक अहवाल राज ठाकरेंकडे पोहोचवला'; पत्रकार परिषदेत बोलताना वसंत मोरे भावूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com