Ahmednagar : वीज पुरवठा सुरळीत करा

वंचीत बहुजन आघाडीचे शेवगाव महावितरण समोर धरणे
वीज पुरवठा खंडित
वीज पुरवठा खंडित sakal

शेवगाव : शेतीपंपांचा खंडित वीजपुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव येथील महावितरण कार्यालयासमोर राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, उपाध्यक्ष विशाल इंगळे, राजू नाईक, सलीम शेख, शहराध्यक्ष विकी मगर, चाँद शेख, अरविंद साळवे, रमेश खरात, दीपक वाघमारे, विष्णू तुजारे, सागर तिजोरे, सागर गरुड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हातून पावसामुळे खरीप पिके गेलेली असताना, रब्बीच्या हंगामात त्यांना वीजजोड तोडून वेठीस धरणे चुकीचे आहे. राज्य सरकार व महावितरण शेतकऱ्यांना या माध्यमातून छळत आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, ऊस या पिकांवर मोठ्या प्रमाणात केलेला खर्च पाण्याअभावी वाया जाणार आहे. त्यामुळे पीक हातून गेल्यास शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार आहे. आम्ही याविरोधात आवाज उठवत असताना आम्हाला नोटिसा देऊन, लोकशाही मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत पोलिस दडपशाही करत आहेत. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शेतक-यांसह आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. महावितरणचे उपअभियंता एस. एम. लोहारे यांना निवेदन दिले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल यांनी पथकासह बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com