अहमदनगर : पक्षीय जोडे बाजूला ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार डॉ. सुजय विखे पाटील

अहमदनगर : पक्षीय जोडे बाजूला ठेवा

अहमदनगर: शहराचा विकास होण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. पक्षीय जोडे बाजूला ठेवून कामे करावी लागतील. गरिबांच्या कल्याणासाठी माझे कायम सहकार्य राहील, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.शहरातील संजयनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून महानगरपालिका, कम्युनिटी डिझाइन एजन्सी आणि स्नेहालय यांच्या पुढाकारातून पान साकारलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांसाठीच्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण आज झाले. या वेळी कुटुंबांचा गृहप्रवेश झाला. त्यावेळी खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीना चोपडा, नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेविका सुवर्णा जाधव, माजी नगरसेवक धनंजय जाधव, दत्ता जाधव, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, संजय गुगळे उपस्थित होते.

खासदार विखे पाटील म्हणाले, की हा प्रकल्प गरिबांसाठी आहे. यात राजकारण नसावे. समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन गरीब जनतेला आधार दिला पाहिजे. त्यांच्या विकासात पुढे आले पाहिजे. त्यात राजकारण नको. गट-तट बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. काहीही असले, तरी खासदार म्हणून मी शहराच्या विकासासाठी कायम पुढाकार घेईन. माझे कायम सहकार्य असेल. दरम्यान, या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे खासदार विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

असा आहे प्रकल्प

संजयनगर येथील रहिवासी, अहमदनगर महानगरपालिका, स्नेहालय संस्था आणि करी स्टोन फाउंडेशनचा उपक्रम असलेली कम्युनिटी डिझाइन एजन्सी (सीडीए) यांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजनेतून (पीएमएवाय) हा प्रकल्प साकारला आहे. ३३ घरांच्या गृहप्रकल्पामुळे ही ‘स्वप्नपूर्ती’ झाली आहे.

Web Title: Ahmednagar Shoes Housing Project Aside

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..