कुठेही पोहण्याचा मोह बेतू शकतो जिवावर; तलाव अन् शेततळ्यात पोहणे धोक्याचे, असे होतात अपघात

मुलांना धरण, धबधबा, तलाव आणि नदीचे आकर्षण असते. मात्र, अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली, अडथळे आपल्याला माहिती नसतात.
Ahmednagar
Ahmednagar Esakal
Updated on

Swimming in Natural Ponds Can be Dangerous: मुलांना धरण, धबधबा, तलाव आणि नदीचे आकर्षण असते. मात्र, अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली, अडथळे आपल्याला माहिती नसतात. यामुळे स्थानिक नागरिकांच्या मार्गदर्शनाशिवाय पाण्यात उतरलो, तर मृत्यूही ओढवण्याची शक्यता असते. यामुळे पाण्यात उतरताना काळजी घेणे अंत्यत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दहावी-बारावीची परीक्षा संपल्यानंतर व सोबतच उन्हाचा तडाखा वाढल्यावर मुलांना पोहण्याचा मोह आवरत नाही. ग्रामीण भागात छोटे तळे, तलाव, विहीर व शेततळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुले पोहण्यास जातात. परंतु, हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसते. यामुळे धरण व शेततळ्यामध्ये अनेक लहान-मोठ्यांना प्राण गमवावे लागतात. यामागे मुख्य कारण म्हणजे पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे, फाजील आत्मविश्वास. अनेक पट्टीचे पोहणारेही अनोळखी ठिकाणी बुडल्याच्या घटना घडल्या आहेत.

शहरातील जलतरण तलावात पोहण्याची सवय असेल, तर ती व्यक्ती विहीर, धरण, तलाव आणि समुद्रात तितक्या कुशलतेने पोहू शकत नाही. अनेक ठिकाणी पाण्यात भोवरे असतात. शेवाळ जमा झालेले असते. याची माहिती स्थानिक नागरिकांना असते. अनोळखी ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात उतरणे आवश्यक आहे. समुद्र असो व धरण अनेक ठिकाणी प्रशासनाने धोक्याच्या सूचना लिहिलेल्या असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

असे होतात अपघात

मित्रांचा आग्रह, सेल्फीचा नाद, रील्स बनविणे, मित्रांसमोर मोठेपणा मिरविणे, मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी, मीसुद्धा कुणापेक्षा कमी नाही, अशी भावना ठेवून व पाण्याच्या प्रचंड आकर्षणामुळे, पाण्यात खेळण्याचे, उड्या मारण्याचे, फिरण्याचे, पोहण्याचे धाडस विद्यार्थी करतात आणि अशाच वेळी अपघात होतात. (Latest Marathi News)

Ahmednagar
Sanjeev Bhatt: माजी IPS अधिकारी संजीव भट्ट 28 वर्षांनंतर दोषी! काय आहे प्रकरण जाणून घ्या

विविध कारणांमुळे दरवर्षी पोहताना शेकडो मुलांचा अपघाती मृत्यू होतो. यामुळे शाळकरी मुलांना शाळेतच पोहण्याचे शिक्षण देण्यात यावे, प्रत्येकाला जलतरणाची संपूर्ण माहिती, समुपदेशन, मार्गदर्शन, शिक्षण व प्रशिक्षण जलतरण साक्षरता अभियान राबविण्याची गरज आहे.- गणेश कुलकर्णी, प्रशिक्षक.(Latest Marathi News)

नदी, नाले, तलावामध्ये झाडेझुडपे व जाळ्या असतात. त्यामुळे जिवाला जास्त धोका असतो. यामुळे मुलांनी व शहरातील लोकांनी जलतरण तलावामध्ये प्राथमिक धडे घ्यावेत, सुरक्षेच्या दृष्टीने जलतरण तलावावर जीवरक्षक, प्रशिक्षक उपलब्ध असतात; तसेच जीव संरक्षणाचे अनेक साहित्य जलतरण तलावाच्या अवतीभवती उपलब्ध असते.- रावसाहेब बाबर, आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक.

Ahmednagar
Sadabhau Khot : सदाभाऊंनी राजू शेट्टींच्या विरोधात ठोकला शड्डू! हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी फडणवीसांना भेटणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com