अहमदनगर : चोरट्यांनी गॅरेजमधून लांबवला 27 हजारांचा ऐवज

Thief
Thiefesakal

अहमदनगर : शहरातील अहमदनगर महाविद्यालयजवळ ऑटो गॅरेजमध्ये चोरीची घटना घडली. कोतवाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी तीन आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ सुभाष रानमळ (वय 35, रा. नागरदेवळे, ता. नगर) यांचे अहमदनगर महाविद्यालयाशेजारी सुभाष ऑटो केअर नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी ता. 31 डिसेंबरला रात्री साडे आठ ते ता. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी दहा वाजण्यापूर्वी दुकानातील लोखंडी लोडर, 14 इंची नांगर असा 27 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता.

Thief
लग्नसोहळे महागात? खासदार सुजय विखे पाटलांना कोरोनाची लागण

रानमळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी मतिन गफ्फार शेख (वय 31, रा. कोठी), इरफान अन्वर शेख (वय 25, रा. शाहूनगर, केडगाव) आणि समीर बाबासाब शेख (वय 38, रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा) यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक धोत्रे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Thief
घाबरू नका! ओमिक्रॉन कमकुवत बनलाय - योगी आदित्यनाथ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com