नगरमध्ये फुलली गांजाची शेती, तीन शेतकऱ्यांनी केली लागवड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

पाथर्डी तालुक्‍यातील एकनाथवाडी शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदेशीर गांजाच्या शेतीवर काल (बुधवारी) छापा टाकला. यात तीन शेतकऱ्यांच्या शेतात सहा लाख 23 हजार 450 रुपयांचा गांजा जप्त केला. 

नगर ः शेती वाढत्या उत्पादन खर्चामुळे परवडत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. हमी भाव दिल्यास बहुतांशी प्रश्न सुटतील. शेतकरी संघटनांच्या या मागणीकडे सरकार वेळोवेळी दुर्लक्ष करते. त्यावेळी अस्वस्थ झालेले शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गांजाची शेती करण्याची आगतिकपणे आवाहन करतात. मात्र, पाथर्डीत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बिनधोकपणे शेतात गांजा पेरलाय.

पाथर्डी तालुक्‍यातील एकनाथवाडी शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेकायदेशीर गांजाच्या शेतीवर काल (बुधवारी) छापा टाकला. यात तीन शेतकऱ्यांच्या शेतात सहा लाख 23 हजार 450 रुपयांचा गांजा जप्त केला. 

हेही वाचा - नगर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना पाथर्डी तालुक्‍यातील एकनाथवाडी येथे एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापे टाकले असता एकनाथवाडीतून तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

यात विष्णू अनिल डोंगरे, बाळासाहेब भानुदास खेडकर, शहादेव रावसाहेब खेडकर यांचा समावेश आहे. विष्णू डोंगरेच्या शेतातून एक लाख 91 हजार 900 रुपये किमतीचा 19 किलो 155 ग्रॅम, बाळासाहेब खेडकरच्या शेतातून तीन लाख 87 हजार 500 रुपयांचा 38 किलो 750 ग्रॅम तर शहादेव खेडकरच्या शेतातून 44 हजार 400 रुपये किमतीचा चार किलो 440 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ahmednagar, three farmers planted cannabis