Ahmednagar :निसर्गाला शरण जाण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Ahmednagar : निसर्गाला शरण जाण्याची वेळ

अहमदनगर : पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनत असताना, निसर्गाला शरण जाण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी आज येथे केले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

विधाते यांच्यासह व युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांच्या हस्ते कल्याण रोड येथील संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत वृक्षारोपण अभियानाची सुरवात करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. निसर्गाने मनुष्याला भरभरून दिले मात्र मनुष्याने स्वत:च्या हितासाठी निसर्गाची मोठी हानी केली. पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज आहे, असे विधाते म्हणाले.

यावेळी शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, संचालक संजय सागावकर, शिक्षक जगन्नाथ कांबळे, सुशीलकुमार आंधळे, राजेंद्र गर्जे, चंदा कार्ले, रूपाली जाधव, कल्पना भामरे, सौ. जरे, सारिका जाधव आदींसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवकच्या वतीने कनोरे प्रशालेत वृक्षारोपण अभियान राबविताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर. समवेत शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, संचालक संजय सागावकर, शिक्षक जगन्नाथ कांबळे, सुशीलकुमार आंधळे आदी.