त्या फुलांच्या गंधकोषी... सांग तू आहेस का?

मोरया चिंचोरे डोंगरावर फुलपाखरांच्या ४५ प्रजाती
butterfly
butterflysakal

नेवासे : जीवन स्व‍च्छंदी हवं, अगदी फुलपाखरासारखं... अशीच अनेकांची इच्छा असते. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी फुलपाखरं हल्ली गायब झालीत. प्रचंड वेगात वाढणाऱ्या औद्योगिकीकरणासह अनेक बाबी त्यास कारणीभूत आहेत. सह्याद्रीच्या रांगांतील जैवविविधता धोक्यात आली आहे. डोंगर उजाड झालेत. फुलपाखरांची पैदास ज्या वृक्षांवर, गवतावर होते, त्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे.

वृद्धेश्वर, डोंगरगण, अकोले परिसरात फुलपाखरे मुबलक आहेत. मात्र, या वसतिस्थानांत आता मोरया चिंचोरेची भर पडली आहे. तेथे फुलपाखरांच्या तब्बल ४५ प्रजाती आढळतात. हे अभ्यासक, पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे.

butterfly
T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव दत्तक घेतले आहे. मोरया चिंचोरे येथील सुपाता व मानबाई डोंगर आणि जंगल परिसराने जैवविविधता जपली आहे. तेथे मुक्त संचार करणारे वन्य प्राणी पर्यटकांना भुरळ घालतातच; मात्र या जंगलाच्या सौंदर्यात आणखी भर घातली ती मुक्तपणे स्वच्छंद विहार करणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांनी.

पावसाने जूनच्या पहिल्याच दिवसापासून सर्वत्र बरसायला सुरवात केली. सततच्या पावसाने मोरया चिंचोरे येथील डोंगर, जंगले, माळरान परिसरातील विविध वनस्पती आणि रानफुले बहरली आहेत. या परिसरात व रानफुलांवर ४० ते ४५ प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरे दिसतात. वेगवेगळ्या रंगांची ही फुलपाखरे पर्यटकांचे, विशेषत: बालगोपाळांचे लक्ष वेधून घेतात.

या प्रजातींची फुलपाखरे

ग्रास यलो, माँटल्ड इमिग्रंट, प्लेन टायगर, ब्लू पॅन्सी, ब्लू टायगर, लेमन पॅन्सी, ग्रास ज्वेल, कॉमन फॉर रिंग, पायोनियर, राइस स्वीफ्ट, डेनाइड एगफ्लाय, कॉमन रोझ, कॉमन मॉरमॉन, कॉमन क्रो, क्रिमसन रोझ, ऑरेंज टीप, ब्राऊन, कॉमन लेपर्ड, सिल्व्हर लाइन.

यांनी दिल्या भेटी

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, चित्रपट निर्माते नागराज मंजुळे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अभिनेते सयाजी शिंदे, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे आदी प्रसिद्ध व्यक्तींनी मोरया चिंचोरेच्या डोंगरावर सैर केली आहे.

‘यशवंत’ची कामे

एक लाख वृक्षलागवड व संगोपन, आठवी ते दहावीपर्यंत शैक्षणिक सुविधा, यशवंत हॉस्पिटल, सोळा बंधाऱ्यांचे खोलीकरण-रुंदीकरण, १२२५ हेक्टर क्षेत्रावर बांधबंदिस्ती, १०० हेक्टरवर सलग समपातळीवर चर, १३ बंधाऱ्याचे काम, वन्य प्राण्यांसाठी ५ पाणवठे, सूक्ष्म उद्योजकताअंततर्गत विविध कामे.

butterfly
एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

ही आहे जैवविविधता

या जंगल परिसरात अडीचशेपेक्षा जास्त प्रजातींची झाडे-झुडपे व गवत आहे शंभरपेक्षा जास्त प्रजातींचे प्राणी, पस्तीसपेक्षा जास्त प्रजातींचे सरपटणारे प्राणी, पासष्टपेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी, शंभरपेक्षा जास्त प्रजातींचे किटक व चाळीसपेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरे, अशी जैवविविधता असल्याची माहिती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे समन्वयक व उद्यान विभागप्रमुख प्रा. योगेश जाधव व बाबासाहेब दराडे यांनी दिली.

नगर जिल्ह्यात फुलपाखरांच्या ६० पेक्षा अधिक प्रजाती आढळल्या. प्रजनन व अन्न उपलब्ध असणाऱ्या अनुकूल वनस्पती असतील अशा ठिकाणी फुलपाखरांचे वास्तव्य असते. मोरया चिंचोरे येथील डोंगर भागात फुलपाखरांना अनुकूल अशा वनस्पती, तलाव, ओढ्यांचे पाणी असल्याने, त्यांचे प्रमाण मोठे आहे.

- जयराम सातपुते, पक्षीअभ्यासक, नगर

सामान्यपणे फुलपाखरांसह इतर अनेक कीटक आपले जीवनचक्र वर्षातून एकदा पावसाळ्यात पूर्ण करीत असतात. यंदा मोसमी व परतीच्या सततच्या पावसाच्या कृपेमुळे फुलपाखरांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांचे प्रजनन जोमाने सुरू आहे. त्यामुळे ते क्रियाशील बनले आहेत व त्यांचा वावरही वाढला आहे.

- प्रा. डॉ. यशवंत आहेर, पर्यावरण अभ्यासक, नेवासे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com