"रयत"वर या नगरकरांची झाली निवड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

या सर्वांचा निवड कालावधी तीन वर्षांसाठी आहे. निवड झालेल्या सर्वांचे रयत शिक्षण संस्थेच्या कामात मोठे योगदान आहे. या सर्वांनी संस्थेच्या नगर जिल्ह्यातील विकासासाठी काम केलेले आहे

नगर ः रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते अरुण पुंजाजी कडू-पाटील यांची आज फेरनिवड झाली. संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सातारा येथे झालेल्या संस्थेच्या जनरल बॉडीच्या सभेत एकमताने हा निर्णय झाला.

संस्थेच्या उत्तर विभागाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष दादा कळमकर, मॅनेजिंग कौन्सिलच्या विद्यमान सदस्य व शिक्षणतज्ज्ञ मीनाताई जगधने, ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस आणि संस्थेचे मावळते सचिव व येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांची संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर आज एकमताने निवड झाली.

हेही वाचा - साईमंदिरात महिलेने केला बर्थ डे सेलिब्रेट

या सर्वांचा निवड कालावधी तीन वर्षांसाठी आहे. निवड झालेल्या सर्वांचे रयत शिक्षण संस्थेच्या कामात मोठे योगदान आहे. या सर्वांनी संस्थेच्या नगर जिल्ह्यातील विकासासाठी काम केलेले आहे. 

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याचे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात संस्थेची 43 महाविद्यालये, 156 कनिष्ठ महाविद्यालये, 438 माध्यमिक विद्यालये असा तब्बल 759 शाखांचा मोठा शैक्षणिक पसारा आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वाधिक व त्यानंतर नगर व नाशिक जिल्ह्यात संस्थेचा अधिक विस्तार आहे. संस्थेत 18 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा (रयत सेवक) समावेश असून, तब्बल साडेचार लाख विद्यार्थी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar was elected on "Rayat"