esakal | आता पाणीबाणी ः नगर शहराला पाईपलाईन गळतीचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

water nal

आता पाणीबाणी ः नगर शहराला पाईपलाईन गळतीचा फटका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या नव्या मुख्य जलवाहिनीला शिंगवे गाव ते देव नदीदरम्यान गळती लागली आहे. ती काढण्याचे काम आज सुरू करण्यात आले. त्यामुळे मंगळवारी (ता. 27) व बुधवारी (ता. 28) शहराचा पाणीपुरवठा विस्कळित राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

नगर शहर पाणीपुरवठा योजनेची नवी मुख्य जलवाहिनी रविवारी (ता. 25) दुपारी शिंगवे गाव ते देव नदीदरम्यान पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली. दुरुस्तीचे काम आज (ता. 26) मध्यवर्ती शहरात पाणीवाटप झाल्यानंतर हाती घेण्यात आले आहे.

या कामाला वेळ लागणार असल्याने, पाण्याच्या टाक्‍या निर्धारित वेळेत भरणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे रोटेशननुसार मंगळवारी (ता. 27) होणारा शहरातील झेंडी गेट, सर्जेपुरा, मंगल गेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा आदी भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तो बुधवारी (ता. 28) नेहमीच्या वेळेत करण्यात येईल. तसेच बुधवारी (ता. 28) सिद्धार्थनगर, लाल टाकी, दिल्ली गेट, चितळे रस्ता, तोफखाना, नालेगाव, कापड बाजार, आनंदी बाजार, नवी पेठ, माणिक चौक आदी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, या भागाला गुरुवारी (ता. 29) पाणीपुरवठा करण्यात येईल.

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

loading image