In Ahmednagar, young women are on a hunger strike in front of the Zilla Parishad demanding computer operators.jpg
In Ahmednagar, young women are on a hunger strike in front of the Zilla Parishad demanding computer operators.jpg

संगणक ऑपरेटरच्या मागण्या सोडवण्यासाठी तरुणींचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण

अहमदनगर : ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या तरुणांच्या मानधनात वाढ करावी, यासह विविध मागण्यासाठी नगर येथील जिल्हा परिषदेच्या आवारात राज्यातील संगणक ऑपरेटरचे प्रतिनिधी म्हणून सोनू मोहन तिरमारे (नागपूर) व सुनिता विठ्ठल वाणी (नगर) या दोन तरुणींनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मुंबई, पुण्यात उपोषणाला परवानगी मिळत नसल्याने त्यांनी नगरची निवड केली आहे. दोन दिवसापासून उपोषण करत असूनही मंगळवारी उशिरापर्यत जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नाही.

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार सोपा आणि सुलभ व्हावा, यासाठी २७ हजाराच्या जवळपास संगणक ऑपरेटर ११ वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्या नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने केल्या जात आहेत. संगणक ऑपरेटरला महिन्याला केवळ सहा हजार रुपयाचे मानधन दिले जाते. त्यात किमान दुप्पट वाढ करावी, मानधन विशिष्ठ तारखेला दयावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, कामावरुन विनाकारण कमी केलेल्या ऑपरेटरला पुन्हा कामावर घ्यावे या मागण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून संगणक ऑपरेटर पाठपुरावा करत आहेत. मात्र मानधनात दुप्पट वाढ करण्यासह गण्याची दखल घेतली जात नाही. 

सध्या कोरोनाचा काळ असल्याने पुणे, मुंबईत उपोषणाला परवानगी मिळत नाही. मानधन वाढीसह शासनाने राज्यातील संगणक ऑपरेटरचे प्रश्न सोडवावेत यासाठी राज्यातील संगणक ऑपरेटर प्रतिनिधी म्हणून सोमवारपासून नगर जिल्हा परिषदेच्या आवारात सोनू मोहन तिरमारे (नागपूर) व सुनिता विठ्ठल वाणी (नगर) या दोन तरुणींनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस असूनही जिल्हा परिषद प्रशासनाने त्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com