esakal | सभेला यायचं अन् उपाशी जायचं; सदस्यांची झेडपीच्या सभेत नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar zp

सभेला यायचं अन् उपाशी जायचं; सदस्यांची झेडपीच्या सभेत नाराजी

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला येऊन सदस्य उपाशी जात आहेत. हा प्रकार मागील काही सभांतही घडला असल्याने, सदस्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभा सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती, मात्र काही सदस्यांना यायला उशिरा झाला. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने सर्व सदस्यांना जेवण देण्यात आले. ही जेवणावळ आटोपत असतानाच काही सदस्य सभागृहात आले. त्यांनी जेवण मागविले, परंतु पदार्थ संपल्याने सदस्यांनी वारंवार सांगूनही जेवण मिळाले नाही. ही बाब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी ती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. हा प्रकार आजचा नसून, याअगोदरही झाला आहे. सभागृहाच्या दृष्टीने ही भूषणावह बाब नाही.

हाच मुद्दा पकडत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, रामहरी कातोरे, जालिंदर वाकचौरे व संबंधित महिला सदस्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सभा सुरू झाल्यापासून आपण चहा मागतो, पण चहा आला नाही. डायसवर मात्र दोनदा चहा आला. हा काय प्रकार सुरू आहे, असा प्रश्‍न कातोरे यांनी केला. सदस्य चहा व जेवणावर आक्रमक झाल्यानंतर अध्यक्षांनी याबाबत संबंधितांकडे चौकशी केली. मात्र, जेवण संपल्याचे लक्षात आले. असा प्रकार पुन्हा व्हायला नको, असे सांगून वादावर अध्यक्ष घुले यांनी पडदा पाडला.

हेही वाचा: शिर्डीत होणार जिल्हा पर्यटन माहिती केंद्र; रोजगाराची संधी

सभागृहाबाहेर जेवणावळी

सभागृहाबाहेर असलेल्या काहींना दूरध्वनी करून जेवणासाठी बोलाविण्यात आले. मात्र, सभेस उपस्थित असलेल्या सदस्यांना जेवण मिळाले नाही. जेवणावळ झाल्यानंतर सभागृहाशेजारी असलेल्या हॉलमध्ये काहींनी खुर्चीवर बसून सभाही ऐकली.

सुरवातीला मागितला चहा, मिळाला शेवटी

सभा सुरू झाल्यानंतर आपल्याला चहा द्यावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी सभागृहात व्यक्त केली. मात्र, बराच वेळ चहा न आल्याने त्यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. डायसवर बसलेल्यांना दोनदा चहा येतो, आम्हाला एकदा येऊ द्या, असे ते म्हणाले. त्यावर इतर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, तरीही चहा आला नाही. सभा संपण्याच्या अगोदर चहा आला.

अर्धा तास पोळीची वाट पाहिली

जेवताना पोळी आणखी हवी होती म्हणून आपण संबंधितांकडे पोळीची मागणी केली.अर्धा तास वाट पाहत हात धरून बसलो, पण पोळी आली नाही. त्यानंतर आपण तसाच हात धुतल्याची संतप्त भावना जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी सभागृहात मांडली.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या १६ रुग्णांचा मृत्यृ

loading image
go to top