
अहमदनगर : झेडपीत कोरोनाच्या शिरकावाने कर्मचारी वर्ग धास्तावला
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कोरोनाने शिरकाव केलेला आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी धास्तावले असून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, असे मत कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.(Ahmednagar Zilla Parishad Corona News)
हेही वाचा: वाळूमाफियांची अशीही बनवाबनवी..!|डंपर पकडले एक दंड वेगळ्याच नंबरप्लेटवर
जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी कोरोना शिरकाव केला होता. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उयायोजना राबविण्यास सुरवात केलेली आहे. मात्र, तरीही कोरोनाने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शिरकाव केलेला असून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आजअखेर एकूण ३३ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
हेही वाचा: अहमदनगर : कापड बाजारात कोविड तपासणी
त्यामुळे प्रशासनाने कडक उपयायोजना करण्यास सुरवात केलेली आहे. असे असले तरी काही कर्मचाऱ्यांना सर्दी व खोकला असल्याचे दिसून येत आहे. त्यातील काहींनी तपासणी केलेली आहे. तर काहींनी अद्याप तपासणी केलेली नसल्याने त्यांची तपासणी प्रशासनाने करून घ्यावी, अशी मागणी होत आहे.(Ahmednagar ZP Corona News Updates)
जिल्हा परिषदेतील काही कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी रजेवर गेलेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कार्यालय सुरु आहे. याची मात्र प्रशासनाला माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Web Title: Ahmednagar Zilla Parishad Of Corona Shirkavane Working Staff Horrified
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..