
पाथर्डी : संत सेवालाल महाराज बंजारा लमाणतांडा समृद्धी योजनेतून जिल्ह्यातील वीस लमाण तांड्यांना मंजूर झालेला दोन कोटी पाच लाख रुपयांचा निधी अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे हे तांडे विकासापासून वंचित राहिले आहेत. मंजूर झालेला निधी नेमका कधी मिळणार, याकडे वीस तांड्यांवरील लमाण समाज बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. हा निधी लवकर मिळावा, अशी मागणी होत आहे.