
अहिल्यानगर: स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जिल्ह्यात गांधी-नेहरू विचारसरणीचे अनुयायी होते. समाजवाद आणि साम्यवादी विचारसरणीचेही पाईक होते. दत्ता देशमुख, पी. बी. कडू पाटील, अण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर, भाऊसाहेब थोरात यांच्यासारखे नेते मंडळी होती. त्यांनी तळागाळातील लोकांसाठी संघर्ष केला. विकासाचे राजकारण केले. पी. बीं.चा वारसा अरुण कडू पाटील यांनी चालविला. मात्र, अलीकडे संघ, भाजपची विचारधारा रूजतेय. त्यातून सामाजिक कटूता निर्माण होतेय, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.