Ahmedngar : अतिवृष्टीग्रस्तांची दिवाळी होणार गोड

पालकमंत्री ; शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार
hasan mushrif
hasan mushrifsakal

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन महिन्यांत कोरोनाची लाट आली. एका हंगामात चार चक्रीवादळे आणि अतिवृष्टी झाली. यामुळे सरकारचा सर्व पैसा वादळग्रस्त आणि कोरोनाग्रस्तांवर खर्च झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, लवकरच त्यांच्या खात्यांवर मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टीमुळे राज्यात ५५ हजार हेक्‍टरवरील शेती बाधित झाली असून, नगर जिल्ह्यात ९५ हजार ६७९ शेतकऱ्यांची ७० हजार ५९४ हेक्टर शेती बाधित झाली आहे. यात ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मनुष्यहानी झाली, घरे पडली, गोठे पडले, पशुधनाची हानी, घरातील भांडीकुंडी वाहून गेली, शेतजमीन आणि विहिरी वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई देण्यात येणार आहे. राज्य सरकारने भरपाईच्या रकमेत वाढ केलेली असून, जिरायत शेतीमधील पिकांच्या नुकसानीपोटी दहा हजार रुपये प्रतिहेक्‍टर, बागायत भागातील पिकांच्या नुकसानीपोटी १५ हजार रुपये हेक्‍टर आणि फळबागांसाठी २५ हजार रुपये हेक्‍टर, अशी भरपाई देण्यात येणार असून, ही जास्तीत जास्त दोन हेक्‍टरपर्यंत राहणार आहे.

लसीकरणासाठी विशेष मोहीम

जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत कोरोना लसीकरण मोहिमेला प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सध्या दोन लाख डोस शिल्लक असून, पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ६७ टक्के असून, दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या २३ टक्के आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांच्या गटात, गावात विशेष मोहीम राबवून सर्वदूर लसीकरण करावे, असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले.

hasan mushrif
पर्दाफाश! लोकांचे डर्टी व्हिडिओ बनवून नवरा-बायकोनं उकळले 20 कोटी

मिशन वात्सल्य अन्‌ वीरभद्र ताराबाई योजना

कोविडमुळे सुमारे चार हजारांच्या जवळपास महिला भगिनी विधवा झालेल्या आहेत. या महिलांना मिशन वात्सल्य योजनेतून कसा लाभ मिळवून देता येईल, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. या महिलांना भाऊबीजेची भेट म्हणून सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच या विधवा महिलांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतून वीरभद्र राणी ताराबाई स्वयंसाहाय्यता योजनेतून बिनव्याजी कर्जपुरवठा उपलब्ध करून त्यांना वेगवेगळे उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

कोरोनापासून दक्ष राहण्याची सूचना

सिंगापूर, लंडन, चायना, रशिया या ठिकाणी सध्या कोरोनाचे दुप्पट रुग्ण सापडत आहेत. आपल्याकडे सध्या परिस्थिती नियंत्रणात असली, तरी सर्व काही खुले करण्यात आलेले आहे. रस्त्यावर गर्दीचा महापूर आलेला आहे. पर्यटन वाढलेले आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

रुग्णवाहिकांचे लोकार्पण

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँटची क्षमता बाराशे एलपीएम इतकी आहे. या उद्‌घाटन कार्यक्रमानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यासाठी नव्या अत्याधुनिक १९ रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यापैकी प्राथमिक स्वरूपात पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com