'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं; म्हणाले, राग...: Ajit Pawar on CM Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP ajit pawar leader of opposition on cm eknath shinde helth over cabinet extension expansion

Ajit Pawar on CM Shinde: 'सोन्याच्या चहा'वरुन अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं; म्हणाले, राग...

पाथर्डी : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'सोन्याचा चहा' या विधानावरुन अजित पवारांनी यांना निशाणा केलं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथं एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर फटकेबाजी केली आणि उपस्थितांना खळखळून हसवलं. (Ajit Pawar slams on CM Shinde over statement about Golden Tea at Pathardi rally)

पवार म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारला काही चांगला सांगायला गेलो तरी राग येतो. आम्ही पण अनेक वर्षे सरकारमध्ये काम केलं आहे. पण विरोधकांनी सांगितल्यानंतर ज्या गोष्टीची नोंद राज्यकर्ते म्हणून घ्यायला पाहिजे ती आम्ही घेत होतो. यांना सांगितलं तर राग येतो. मुख्यमंत्री मला म्हणाले तुम्ही माझं दोन-अडीच कोटीचं चहाचं बिलच काढलं. मी काही सोन्याचा चहा देत नव्हतो सोन्यासारख्या माणसांना चहा देत होतो. आम्ही काय दुसऱ्या माणसांना चहा देतो, आम्ही पण सोन्यासारख्या माणसांना चहा देतो. काही पण उत्तरं देतात, कशाला कशाचा मेळ नाही.

परदेशात गेले इतका खर्च केला. खर्च केला तर कारखाने आले का? आमच्या काळातहे दीड-दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेले कारखाने परराज्यात गेले कोण जबाबदार आहे याला? पुण्यामध्ये चाकण परिसरात दीड ते दोन लाख रोजगार निर्माण होणार होते. गेला तो प्रकल्प, म्हटले दुसरा आणू पण कशाच काय आणि कशाचं काय? असे अनेक कारखाने गेले.

गेल्या आठ नऊ महिन्यात तुम्ही किती प्रकल्प आणले. सारखं सांगतात आम्ही एमओयू केलेत लवकरच हे प्रकल्प येणारेत. पण कधी येणार? तुम्ही किती दिवस लोकांची दिशाभूल करणार? असा सवालही यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.