esakal | अकोल्याच्या आमदाराची ग्रामपंचायत शिपायाला मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Akola MLA beats Gram Panchayat employee

मला ओळखले का मी कोण आहे. असे म्हणत त्यांनी माझ्या पोटात व छातीत लाथ मारून मला शिवीगाळ केली. त्यानंतर ते गाडीत बसून निघून गेले.

अकोल्याच्या आमदाराची ग्रामपंचायत शिपायाला मारहाण

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले : आमदार डॉ . किरण लहामटे यांनी मारहाण केल्याची तक्रार खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस स्टेशनला केली आहे.

१७ सप्टेंबर २०२० रोजी तक्रारदार हा खडकी बुद्रुक दुपारी १२. ३० वाजण्याच्या सुमारास आपल्या गावात दत्त मंदिराजवळ पायी जात होता. त्यावेळी मागून आमदार डॉ. किरण लहामटे यांची गाडी जोरात येऊन कट मारून गेली. त्या वेळी आम्हाला वाटले पर्यटक आहेत म्हणून गाडी हळू चालवा असे ओरडून सांगितले.

या गोष्टीचा राग आल्याने आमदार गाडी थांबवून खाली उतरले. ते म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे. असे म्हणत त्यांनी माझ्या पोटात व छातीत लाथ मारून मला शिवीगाळ केली. त्यानंतर ते गाडीत बसून निघून गेले. या वेळी त्याच्यासोबत मनोहर सखाराम भांगरे होते.

राजूर पोलिसांनी संबंधित तक्रार घेतली असून अदखलपात्र गुन्हा रजि . क्रमांक १२८३/२० भादंवि ५०४. ५०६  दाखल केला आहे . या घटनेचे पडसाद उमटले आहेत. या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियातही आमदार समर्थक आणि विरोधकांमध्ये विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी या घटनेचा निषेध करून चौकशीची मागणी केली आहे. अहमदनगर

असे काहीही घडले नाही. विरोधकांनी मला बदनाम करण्यासाठीच हे षडयंत्र रचले आहे. यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत.

- डॉ. किरण लहामटे, आमदार, अकोले.