Accident News : 'अकोलेत ट्रॅक्टर उलटल्याने एकाचा मृत्यू'; शेतात भात लागवडीसाठी चिखल करत घडली घटना
Akole Accident: ट्रॅक्टर शेतात फसला आणि उलटला. या ट्रॅक्टरच्या खाली चिखलात विलास बांबळे दबले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार सुनील पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
अकोले : अकोले तालुक्यातील मवेशी येथील शेतकरी शेतात भात लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या सहायाने चिखल करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन मृत्युमुखी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली.