

Maharashtra Heavy Rain Akole Faces Landslides Floods Road Blockages And Rising Water From Bhandardara Dam
sakal
अकोले : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कळसूबाई, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, पाचनई, हरिश्चंद्रगड, शेंडी, वारंघुशी, पाचपट्टा, पांजरे आणि धामणमाळ परिसरात दरडी कोसळणे, भूस्खलन, रस्ते बंद होणे, झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.