Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ
Akole Shocker: आकांक्षा हिचा विवाह शुभम गोरख परासूर याच्यासोबत झाला होता. सासरी छळ होत असल्याने तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयत आकांक्षाच्या आई सुनीता दादाभाऊ सांगडे (वय ४७ रा. शेडगाव, ता. संगमनेर) यांनी अकोले पोलिसांत दिली आहे.
Tragedy in Akole: Married woman dies by suicide after persistent harassment from in-laws.Sakal
अकोले : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यात घडली. पोलिसांनी याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकांक्षा शुभम पारासूर (वय २३) असे मयत विवाहितेचे नाव आहे.