Akole Snake Sightings: उष्णतेने सापांची मानवी वस्तीकडे धाव ;अकोल्यातील अनेक गावांमधील घर, शाळा, दुकानांत सापांचा मुक्त वावर

Akole Snake Sightings : नोव्हेंबरमध्येही तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचल्याने अकोले तालुक्यात सापांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. गेल्या आठ दिवसांत २७ ठिकाणी साप आढळले असून घर, शाळा आणि दुकानांमध्ये साप शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
Snake rescuers safely capture a viper found under a gas stove in a house in Rajur.

Snake rescuers safely capture a viper found under a gas stove in a house in Rajur.

esakal

Updated on: 

अकोले : नोव्हेंबर महिन्यातही उन्हाचा तडाखा कायम असून तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जंगल आणि शेतशिवारातील सापांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे. घर, अंगण, शाळा आणि दुकानांमध्ये साप आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, गेल्या आठ दिवसांत अकोले तालुक्यात तब्बल २७ ठिकाणी साप आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...