घाबरेल ती माऊली कसली! दोन वर्षाच्या मुलीसाठी तीने घरात आलेल्या बिबट्यावर केला हल्ला

शांताराम काळे
Friday, 1 January 2021

सूर्य मावळतीला गेला... रंजना सुनील भांगरे घरात दोन वर्षाच्या धनश्री  मुलीला घेऊन टीव्ही पहात होत्या...

अकोले (अहमदनगर) : सूर्य मावळतीला गेला... रंजना सुनील भांगरे घरात दोन वर्षाच्या धनश्री  मुलीला घेऊन टीव्ही पहात होत्या... मात्र, दरवाजा बंद करण्याचा राहून गेला. साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांचे काळे कुत्रे पळत आले नी स्वयंपाक घरात जिवाच्या अंकाताने चूल घरात पळाले.

त्यावेळी धनश्री दाराच्या समोर असलेल्या खुर्चीत बसलेल्या होत्या. रंजना बाई काय झाले म्हणून दरवाजा जवळ आल्यातर बिबट्या दारात एक पाय व घरात एक पाय टाकून उभा... काय करावे सुचेना मात्र त्याला हाकलले नाही तर..? धनश्रीने बिबट्याला पाहिले व जोराचा आवाज करत पुढे दुसरे पाऊल टाकताच तिने सर्व ताकद एकवटून ओरडून बिबट्याला खुर्ची अंगावर फेकत व मुलीला पोटाशी धरून वाचवा म्हणत पळ काढला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आजूबाजूला असणाऱ्या वस्तीच्या लोकांना बोलवले. त्यामुळे बिबट्या बीचकला. त्याने रंजनाचा अवतार पाहून त्याने जंगलात धूम ठोकली. त्याला हुस्कले नसते तर त्याने धनश्रीला शिकार केले असते. मात्र आईने आपल्या लेकरासाठी हातात प्लास्टिक खुर्ची भिरकवत व जोराचा आवाजाने तिने बिबट्याला हुस्कवले. धनश्री व कुत्र्याचे प्राण वाचवले. 

घटनेची माहिती मिळताच राजूरचे वनक्षेत्रपाल जयराम गोंदके, विजय भांगरे, कळसूबाई अभ्यारण्यचे डी. डी. पडवळ, अमोल आडे, वणपाल परते, वनरक्षक करवंदे घटनास्थळी पोहचले त्यानी तिथे पिंजरा लावून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. हा बिबट्या मादी जातीचा असून त्याला तीन बछडे असल्याचे परिसरातील लोक सांगत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akole taluka a woman attacked a leopard