

Public Outrage in Pathardi Over Alleged Irregularities; Rajale Seeks Explanation
Sakal
पाथर्डी : विहीर असो, गायगोठा असो किंवा घरकुल मंजूर करण्याचा प्रस्ताव असो पैसे घेतल्याशिवाय कामे मार्गी लागत नाही, पैसे देऊनही काम होईलच याचीही शाश्वती नाही. अधिकाऱ्यांनीच आता कोणत्या कामाला किती पैसे द्यावे, याचे रेटकार्ड जाहीर करावे, अशा शब्दांत विविध गावच्या ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या कामकाजाचे वाभाडे आमदार मोनिका राजळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत काढले.