अहमदनगर : इथेनॉलनिर्मितीची परवानगी द्या; सदाशिव लोखंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : इथेनॉलनिर्मितीची परवानगी द्या; सदाशिव लोखंडे
अहमदनगर : इथेनॉलनिर्मितीची परवानगी द्या; सदाशिव लोखंडे

अहमदनगर : इथेनॉलनिर्मितीची परवानगी द्या; सदाशिव लोखंडे

शिर्डी : उसाच्या रसापासून थेट इथेनाॅलनिर्मिती(Ethanol) फायद्याची आहे. मात्र कर्जात बुडालेले सहकारी साखर कारखाने(sugar factory) इथेनाॅलनिर्मितीचा फायदा ऊस उत्पादकांना देऊ शकणार नाहीत. उत्पादकांचे हित लक्षात घ्या. त्यांच्या उसाला जादा भाव मिळू द्या. त्यासाठी सहकारी प्रमाणेच खासगी उद्योजकांना देखील इथेनाॅलनिर्मितीची परवानगी द्या, अशी मागणी खासदार सदाशिव लोखंडे(mp sadashiv lokhande) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(deputy cm ajit pawar) यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्याचे आश्‍वासन लोखंडे यांना दिले.मुंबईत आज (गुरुवार) उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत या संदर्भात पार पडलेल्या बैठकीत लोखंडे यांनी ही मागणी केली. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील(minister balasaheb patil) आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: निळवंडे उच्चस्तरीय कालव्यासाठी संघर्ष समितीची अकोल्यात निदर्शने

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना लोखंडे म्हणाले, थेट उसापासून इथेनाॅलनिर्मिती केली, तर उत्पादकांना प्रतिटन तीन हजार रुपये भाव मिळेल. मात्र कर्जात बुडालेल्या सहकारी साखर कारखान्यांना इथेनाॅलनिर्मितीची परवानगी दिली, तरी ते शेतकऱ्यांना कधीही अधिकचा भाव देऊ शकणार नाहीत. सहकारी कारखाने वाचविण्यासाठी त्यांना झुकते माप दिले, तर उत्पादकांना तोटा सोसण्याची वेळ येईल. त्यांच्यावर अन्याय होईल. खासगी उद्योजकांना अवघ्या पन्नास ते साठ कोटी रुपये खर्चात थेट उसाच्या रसापासून इथेनाॅलनिर्मिती प्लँट सुरू करणे शक्य आहे. कर्जात बुडालेल्या कारखान्यांपुरते हे प्लँट मर्यादित ठेवले, तर उत्पादकांवर मोठा अन्याय होईल. त्यामुळे परवाने देताना सर्वांचा विचार व्हावा.

हेही वाचा: Video : अहमदनगर जिल्ह्यातील वाकी धरण ओव्हरफ्लो; ९७ क्यूसेकने निळवंडे धरणात सोडले पाणी

पेट्रोलमध्ये इथेनाॅल मिसळल्याने खर्च कमी होतो. केंद्र सरकारला पेट्रोलमध्ये तीस टक्क्यांपर्यंत इथेनाॅल मिक्स करायचे आहे. मात्र तुटवडा असल्याने सध्या हे प्रमाण अवघे दहा टक्के आहे. पेट्रोलच्या तुलनेत इथेनाॅलचे दर खूप कमी असल्याचे भविष्यात इथेनाॅलला चांगले भाव राहतील. शेतकऱ्यांच्या उसाला अधिक भाव मिळेल. याबाबत सर्वांना इथेनाॅल निर्मितीची खुली परवानगी मिळायला हवी.

उसाच्या रसापासून इथेनाॅलनिर्मिती उद्योगामुळे आगामी काळात मोठा अर्थिक फायदा होईल. मात्र तो ऊस उत्पादकांपर्यंत न्यायचा असेल, तर सहकारीबरोबरच खासगी उद्योजकांना देखील इथेनाॅलनिर्मितीची परवानगी द्यायलाच हवी. आणखी काही कालावधीनंतर निव्वळ इथेनाॅलवर चालणारी वाहने बाजारात येणार आहेत. या इथेनाॅल क्रांतीचा फायदा शेतकऱ्यांना व्हायला हवा.

- सदाशिव लोखंडे, खासदार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top