
अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या २७ जुलैला सायंकाळी ६ वाजता मोठ्या थाटात या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. समिती व आंबेडकरी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.