
-राजेंद्र पानकर
शहरटाकळी : शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील हरिभाऊ किसन खंबरे यांच्या दृष्टिहीन नात अंबिका संजय गवते हिने ८९.५० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. दिव्यांगत्वावर मात करत अंबिकाने मेहनत, जिद्द आणि चिकटीच्या जोरावर यश संपादन केले. तिचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे.