
अहिल्यानगर: पोषण ट्रेकर ॲपद्वारे टीएचआर वाटप करताना फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळे (एफआरसी) उडालेला गोंधळ, निकृष्ट आहार, वेतनश्रेणी, महागाई भत्ता व मानधन वाढत्या प्रश्नांसंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आंदोलनासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी परिसर दणाणला.