श्रीरामपुरात अंगणवाडी सेविकांची 'मोबाईल वापसी'; नव्या मोबाईलची केली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anganwadi Workers

श्रीरामपुरात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

श्रीरामपूर ( जि. नगर) : शासकीय कामासाठी सरकारने दिलेले मोबाईल तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट आहेत. त्यामुळे ते वापरताना अनेक अडचणी येतात, असा आरोप करीत अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत मोबाईल सरकारकडे परत केले.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र बावके, अध्यक्षा मदिना शेख, जीवन सुरुडे, शरद संसारे, अंगणवाडी कर्मचारी रतन गोरे, इंदूबाई दुशिंग उपस्थित होते. यावेळी बालविकास विभागाच्या सहायक प्रकल्पाधिकारी सी. व्ही. भारती, पर्यवेक्षिका एम. जी. राजळे, पी. बी. बडाख, सीमा विभूते यांना निवेदन व मोबाईल देण्यात आले. बावके म्हणाले, की सन २०१९मध्ये सेविकांना दिलेल्या मोबाईलची वॉरंटी मे २०२१ मध्येच संपली. त्यामुळे सेविकांनी १७ ऑगस्टपासून प्रकल्प कार्यालयात मोबाईल परत करण्याचे आंदोलन सुरू केले. सरकारने दिलेल्या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थींची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती माता, पोषणआहार वाटपाची माहिती भरण्यासाठी करतात. मात्र, क्षमता कमी असल्याने हे मोबाईल वारंवार नादुरुस्त होत. दुरुस्तीचा खर्च सेविकांकडूनच वसूल केला जातो.

हेही वाचा: नगर : मोफत वाटपासाठी रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पलटी

सध्या अनेक सेविकांकडील मोबाईल नादुरुस्त आहेत. त्यामुळे सरकार जोपर्यंत चांगल्या दर्जाचे मोबाईल देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती बावके यांनी दिली. संघटनेच्या अध्यक्षा मदिना शेख यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आंदोलनात शोभा विसपुते, निर्मला चांदेकर, इंदूबाई दुशिंग, मंगल निधाने, अश्‍विनी अभंग, अलका गायकवाड, अश्‍विनी कुलकर्णी, ताराबाई आसने, आशा बोधक, कडूबाई साळुंखे, मंदाकिनी शेळके यांनी सहभाग नोंदविला.

हेही वाचा: नाशिक : द्वारका ते नाशिकरोड थेट उड्डाणपूल; नितीन गडकरींची घोषणा

Web Title: Anganwadi Workers Protest Returned Defecated Mobiles To The Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ahmednagar