Anna HazareSakal
अहिल्यानगर
Anna Hazare: ‘ऑपरेशन सिंदूर’ अचूक निर्णय: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून लष्करासह सरकारचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जशास तसे ठोस उत्तर देत काल मध्यरात्री एअर स्ट्राइक केला. त्यात पाकिस्तानव्याप्त काश्मीर सीमेवरील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.
-मार्तंड बुचुडे
पारनेर : पहलगामच्या हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे, भारताने अतिशय अचूक वेळी अचूक घेतलेला निर्णय आहे. त्याबद्दल प्रथम सैन्याचे व नंतर सरकारचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. सैन्याच्या कौतुकाची शब्दाने किंमत होणार नाही. मात्र, भारताने केवळ अतिरेक्यांच्या तळावर रात्रीच्या वेळी केलेला हल्ला हे या हल्ल्याचे वैशिष्ट्य आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

