

Bamboo Plantation Campaign Initiated at Ralegan Siddhi Under MGNREGA
sakal
पारनेर : राळेगणसिद्धी येथे महाराष्ट्र शासनाच्या - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आज जलसंधारणाच्या कामालगत बांबू लागवड अभियान शुभारंभ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बांबू बोर्डचे कौन्सिल सदस्य व राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शिवसेना आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार शरद सोनवणे, पारनेर येथील आज शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते सुजित झावरे पाटील, आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.