Anna Hazare : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोक आंदोलन ग्लोबल पीस फाउंडेशन’ची नवी दिशा!

Global Peace Foundation : राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक आंदोलनचे नाव बदलून ‘लोक आंदोलन ग्लोबल पीस फाउंडेशन’ असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या जागतिक स्तरावरील कार्ययोजना आणि सामाजिक मूल्यांवर अधिक भर देण्याची घोषणा करण्यात आली.
Anna Hazare’s Vision for Global Peace Initiative

Anna Hazare’s Vision for Global Peace Initiative

Sakal

Updated on

पारनेर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धी येथे आयोजित लोक आंदोलन न्यासाच्या सर्वसाधारण सभेत संस्थेचे नाव बदलून आता पुढे “लोक आंदोलन ग्लोबल पीस फाउंडेशन” असे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ही संस्था यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य, शांतता आणि व्यवस्थेतील सकारात्मक परिवर्तनासाठी कार्यरत राहणार आहे. सभेला अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “लोक आंदोलन ही संस्था आता विश्वभर समाजकार्याचा विस्तार करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com