प्रशासकाच्या निर्णयामुळे अण्णा हजारे का झालेत नाराज

मार्तंड बुचुडे
Friday, 17 July 2020

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक येणार आहे. त्या प्रसासकाची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार होणार आहे.

पारनेर (अहमदनगर) : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक येणार आहे. त्या प्रसासकाची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार होणार आहे. याचा अर्थ ग्रामपंचायतीवर नव्याने नियुक्त होणारा प्रशासक हा फक्त राजकिय वजनदार असावा लागेल. यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्ती केली. याबाबत परीपत्रकाचा अभ्यास करूण बोलतो असे हजारे यांनी सांगीतले आहे. त्यामुळे अता हजारे नेमके काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : नवीन मतदाराला प्रशासक होण्याची संधी; वाचा कशी काय...
कोरोनामुळे निवडणुका घेता येत नसल्याने अता राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार आहे. राज्यात सुमारे 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या मुदती या वर्षाअखेरीस म्हणजे डिंसेबर अखेर संपत आहेत. या सर्वच ग्रामपंचातीवर प्रशासकाच्या नियुकत्या होणार आहेत. मात्र ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल त्यावेळी तेथे प्रशासक येणार आहे. तेथे निवडणूक होताच त्या प्रशासकाची मुदत तात्काळ संपणार आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकारच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीवर प्रसासक नेमण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी पालमंत्र्यांची शिफारस लागणार आहे. याचा अर्थ पालकमंत्री किंवा त्या तालुक्यातील आमदार  सुचवतील त्यांची वर्णी प्रशासक म्हणून लागणार आहे.  आमदारांचे वर्चस्व आहे त्यांच्याच कार्यकर्त्यांचीवर्णी सरपंचपदी लागणार आहे. मात्र त्यासाठी काही शैक्षणिक पात्रता किंवा संबधीत व्यक्तीचा ग्रामपंचायतीचा कारभार पहाण्याची कुवत किंवा अनुभव विचारात घेतला जाईल याची मात्र खात्री नाही. त्यामुळे यापुढील काळात प्रशासक नियुक्तीनंतर गावागावत वादही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सरपंचपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. या प्रशासकाची निवड पालमंत्र्यांच्या शिफारशीनुसार होणार असली तरीही नियुक्ती मात्र मुख्यकार्यकारी अधिकारी करणार आहेत. याबाबत हजारे यांना ‘सकाळ’ने विचारले असता त्यांनी यावर मी अभ्यास करूण बोलतो, असे सांगीतल्याने आता हजारे काय बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare opinion on the appointment of administrators on the Gram Panchayats in Maharashtra