Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे झाले आक्रमक.
Anna Hazare

Anna Hazare

sakal

Updated on

पारनेर - माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. त्या विरोधात हजारे पाच जुलै पासून बेमुदत उपोषण सुरु करणार होते. मात्र दरम्यान राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत दूरध्वनी वरून चर्चा झाल्यानंतर आता परवा बुधवारी पुन्हा एकदा पांडे यांच्या सोबत राळेगणसिद्धी येथे चर्चा होणार आहे त्यानंतर हजारे यांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com