
पारनेर : देशात सध्या गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही वाढती विषमता समाजाला व देशाला घातक आहे. त्यावर सरकारने योग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. तसे झाले नाही, तर भविष्यात समाजाला यातून मोठे धोके निर्माण होऊ शकतात, अशी भीती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आदर्श गाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व पिंपळनेरचे सरपंच देवेंद्र लटांबळे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.