कोरोनामुळे नगरकर पुरते बेजार...आणखी 12 जणांना बाधा 

 Annoyed enough by Nagrokar due to corona ... hits 12 more people
Annoyed enough by Nagrokar due to corona ... hits 12 more people

नगर ः कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याने नगरकर पुरते बेजार झाले. कोरोनाची परिस्थिती शहरासह जिल्ह्यात गंभीर होत आहे. गेल्या दोन दिवसांत तर कोरोनाच्या आकड्याने भलताच वेग घेतला. प्रशासनाबरोबर जिल्हावासियांचीही चिंता वाढली आहे. आज आणखी बारा रुग्णांची भर पडली. त्यात वाघ गल्ली (नालेगाव) चार, संगमनेर शहर, श्रीरामपूर प्रत्येकी दोन, सुपा, चंदनपूर (राहाता), पारनेर, दरेवाडी (नगर तालुका) प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची आकडा 340 वर पोचला आहे. आज आणखी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 260 झाली आहे. 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये शहरातील वाघ गल्ली (नालेगाव) येथील 42 वर्षांची महिला, 45 व 50 वर्षांचा पुरुष, 18 वर्षांच्या युवकाला कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. 

सुपा (पारनेर) येथील 56 वर्षांची महिला कोरोना बाधीत आढळून आली. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात त्या दाखल झाल्या होत्या. चंदनपूर (राहाता) येथील 24 वर्षांच्या युवकाला कोरोनाची लागण झाली. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मोमीनपुरा (संगमनेर शहर) भागातील 46 वर्षांचा पुरुष, नाईकवाडपुरा भागातील 50 वर्षांची महिला कोरोना बाधित झाली. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. श्रीरामपूर येथील 52 वर्षांच्या पुरुषाला आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच महांकाळ वडगाव (श्रीरामपूर) येथील 76 वर्षांच्या महिला कोरोना बाधित आढळून आली. ठाणेहून (खडकवाडी) पारनेर येथे आलेला 40 वर्षांचा पुरुषाला कोरोना बाधा झाली असून तो मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. कळवा (मुंबई)हून दरेवाडी (नगर) येथे आलेला 40 वर्षांचा पुरुष कोरोना बाधित आढळून आला. तोही मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र नगर येथे आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सावध भूमिका घेत, चितळे रोड, सिद्धीबाग परिसर पत्रे ठोकून सील केला आहे. 

सहा जणांची कोरोनावर मात 
अहमदनगर जिल्ह्यातील सहा रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. यात संगमनेर चार, अकोले, मुंबई येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 260 झाली आहे. सध्या 56 रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com