रोहित पवार यांनी मतदारसंघासाठी पुन्हा दिला १५ ट्रक आटा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन मतदारसंघात ५ ट्रक गहू व तुरडाळ, ४ ट्रक कांदा-बटाटा,लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर पुन्हा ८ ट्रक कांदा-बटाटा मतदारसंघाच्या स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता.

कर्जत: लॉकडाउनच्या काळात लोकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुले मतदारसंघाला आमदार रोहित पवार मदतीचा हात देत आहेत. आतापर्यंत त्यांनी तिसऱ्यांदा मतदारसंघातील गरिबांना अन्न-धान्य पुरवले आहे. तर एकदा सॅनिटायरचे वाटप केले आहे. प्रत्येक गावात धूरफवारणी केली आहे. 

आता पुन्हा एकदा मतदारसंघाला केलेल्या भरीव मदत केली. कर्जत-जामखेडसाठी तब्बल १५ ट्रक आटा आणि साखर दिले आहे. हे साहित्य टप्प्याटप्प्याने पोहोच होणार आहे. कोरोनाशी लढूना' या मोहीमेला राज्यभरातील कानाकोपऱ्यात नेऊन कोरोना वॉरीयर्सना आणि लाखो कार्यकर्त्यांना लढण्याची प्रेरणा देणाऱ्या आमदार पवारांची सामाजिक बांधिलकी मतदारसंघातील तब्बल ३३ हजार कुटुंबांना दिलासा देणार आहे.

हेही वाचा - मुंडे समर्थक म्हणताहेत ही तर टरबुज्या भाजप

'उपाशी पोटी कोणतीही लढाई लढली जाऊ शकत नाही असे ठामपणे सांगणाऱ्या आ.पवारांच्या दात्रुत्वातुन लॉकडाऊनच्या काळात अनेकवेळा कसलाही दिखावा न करता,फोटोसेशन न करता, लॉकडाऊनचे शासकीय नियम पाळून जीवनावश्यक तसेच आरोग्यबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

जामखेड येथे कोरोनाचे अधिक रुग्ण आढळल्याने शहराला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा प्रशासनामार्फत पुरवठा केला जात आहे. या भागातील नागरिकांची अधिक काळजी घेऊन मोठ्या प्रमाणात ही मदत प्रशासनाच्या मदतीने त्यांना दिली जाणार आहे. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या ठिकाणी स्वतः जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. रुग्णांच्या कायम संपर्कात राहून क्वॉरंटाईन केलेल्यांवरही आ.पवारांचा वॉच आहे.

गहू-तांदुळाबरोबरच कांदा बटाटा

लॉकडाऊन सुरू झाल्यापासुन मतदारसंघात ५ ट्रक गहू व तुरडाळ, ४ ट्रक कांदा-बटाटा,लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर पुन्हा ८ ट्रक कांदा-बटाटा मतदारसंघाच्या स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता. सॅनीटायझरचा तुटवडा लक्षात घेऊन बारामतीच्या माध्यमातून सॅनीटायझरची निर्मिती करून राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांना ४५ हजार लिटरपेक्षा अधिक पुरवठा केला. त्याशिवाय कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोरोना वॉरीयर्सना मास्क, चष्मे, हँडग्लोज देऊन मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये निर्जंतुकीकरण औषध फवारणी २ ते ३ वेळा करण्यात आली आहे. ती गरजेनुसार वाढवण्यात येत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 15 trucks of flour for Rohit Pawar's constituency