पंकजा मुंडे यांच्यावर भाजप सोपवणार 'ही' मोठी जबाबदारी, मोठं प्रमोशन?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

मुंबई - महाराष्ट्र भाजपात मोठे फेरफार होण्याची चिन्ह आहेत. यामध्ये अनेक नाराज नेत्यांना प्रमोशन प्रमोशन मिळणार अशी देखील कुजबुज आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. आता या सरकारला १०० दिवस पूर्ण होणार आहेत. एकंदरच गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगलाच धुराळा उडाला, आता वातावरण निवळताना पाहायला मिळतंय. अशात राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये मोठे बदल होतायत. जेपी नड्डा यांच्या गळ्यात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माळ पडलीये, महाराष्ट्रात देखील भाजपात मोठे फेरफार होणार आहेत.

मुंबई - महाराष्ट्र भाजपात मोठे फेरफार होण्याची चिन्ह आहेत. यामध्ये अनेक नाराज नेत्यांना प्रमोशन प्रमोशन मिळणार अशी देखील कुजबुज आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. आता या सरकारला १०० दिवस पूर्ण होणार आहेत. एकंदरच गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचा चांगलाच धुराळा उडाला, आता वातावरण निवळताना पाहायला मिळतंय. अशात राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये मोठे बदल होतायत. जेपी नड्डा यांच्या गळ्यात भाजप राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माळ पडलीये, महाराष्ट्रात देखील भाजपात मोठे फेरफार होणार आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांचं मोठं प्रमोशन होणार अशा चर्चा आहेत. 

मोठी बातमी -  फडणवीसांच्या गळ्यात देशाच्या अर्थमंत्रीपदाची माळ ? पुढचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता..

महाराष्ट्रात सत्ता गमावल्यानंतर आता स्वतः अमित शाह महाराष्ट्र भाजपातील अंतर्गत राजकारणात लक्ष केंद्रित करतायत. पंकजा मुंडे यांच्यासारख्या भाजपचा मोठा चेहरा असलेल्या नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांचं नाराजीनाट्य देखील समोर आलं. दरम्यान आता भाजपात होणाऱ्या मोठ्या बदलांमध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपद हे पंकजा मुंडे यांच्याकडे येऊ शकतं. 

मोठी बातमी - "इथे मराठी माणसाला नोकरी दिली जाणार नाही"

अशी फिरणार सूत्र ? 

महाराष्ट्रातील भाजपचा क्लीन चेहरा देवेंद्र फडणवीस यांची वर्णी देशाच्या अर्थमंत्रीपदावर लागू शकते. अशात महाराष्ट्रातून फडणवीस दिल्लीत गेले तर त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करायला मिळू शकतं. दरम्यान अशात महाराष्ट्रातील विरोधीपक्षनेतेपद रिक्त होईल. महाराष्ट्राचे सध्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपदाची सूत्र जाण्याची शक्यता बोलली जातेय. चंद्रकांत पाटील राज्याचे विरोधीपक्षनेते झालेत तर भाजप प्रदेशाध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशात पंकजा मुंडे यांना भाजपातील अंतर्गत गटबाजीला देखील सामोरं जावं लागू शकतं.  

मोठी बातमी -  ने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल..

गेल्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घटनांमुळे एकेकाळचे मित्र पक्ष आणि हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राजकारण करणात्या भाजप आणि शिवसेनेत फाटलंय. अशात फडणवीस याना दिल्लीत बोलावल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेसोबत संबंध सुधारण्यासाठी भाजप प्रयन्त केले जाऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे.   

reshuffle in maharashtra bjp leder pankaja munde might become maharashtra bjp president 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reshuffle in maharashtra bjp leder pankaja munde might become maharashtra bjp president